दिव्यांग जोडप्याला समाजकल्याण विभागाकडून अर्थसहाय्य :जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेहस्ते धनादेश सुपूर्द#zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दिव्यांग जोडप्याला समाजकल्याण विभागाकडून अर्थसहाय्य :जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेहस्ते धनादेश सुपूर्द#zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांग बांधवांच्या वैवाहिक जीवनास आर्थिक सहाय्य व्हावे या उद्देशाने दिव्यांग अपंग विवाह निधी योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना पंचवीस हजाराचे अर्थसहाय्य केले जाते. 

आज कोरपना तालुक्यातील भोयगाव येथील दिव्यांग जोडपे श्री जोगेश्वर शंकर ढुमणे व सौ. संध्या जोगेश्वर ढुमणे यांना जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे हस्ते आर्थिक सहाय्य म्हणून पंचवीस हजाराचे धनादेश देण्यात आले.

यावेळी त्यांसमवेत, माजी आमदार अॅड. संजयभाऊ धोटे व समाज कल्याण अधिकारी जाधव साहेब उपस्थित होते.