खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा ( 5 जून )
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कापडी मास्क व ग्रामगीता पुस्तक वितरित करण्यात आले.बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत जागतिक आदर्श मास्क बँक उपक्रमा अंतर्गत जमा झालेल्या मास्क चे विविधक्षेत्रातिल मांन्यवरांना मास्क केले गेले.
कोरोणा विषाणुचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येकाला मास्क ची आवश्यकता आहे. त्यामुळे आदर्श शाळेने जास्तीत जास्त लोकांपर्यंत मास्क पोहचवणे व कोरिणा विषाणुचा संसर्ग पसरन्यापासून बचाव करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करने सतत सुरू ठेवले आहे.
लॉक डाऊन च्या काळात सुधा आपले कर्तव्य बजावत सामाजिक वनीकरन व वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धन ,संरक्षना करीता धडपडनार्याना जागतिक पर्यावरण दिनाच्या नीमीत्याने मास्क भेट देण्यात आले.
यावेळी सामाजिक वनीकरन विभागाचे यू.एम. जंगम ,वनपरीक्षेत्र अधिकारी , के.एन.घूगलोत, वनपाल , ए.यू.मत्त्ते ,वनरक्षक ,चहारे हे उपस्थित होते. तर वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापक ,आदर्श हायस्कूल, नलीनी पिंगे ,मुख्याध्यापिका ,आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर , बादल बेले,राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख ,संतोष वडस्कर, सहाय्यक शिक्षक आदिंनी परिश्रम घेतले.