वाघाच्या हमल्यात शेतकरी ठार : आज दुपारची घटना : परिसरातील चौथी घटना उघडकीस आल्याने शेतकरी भयभीत !#wild_attack_tiger - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाच्या हमल्यात शेतकरी ठार : आज दुपारची घटना : परिसरातील चौथी घटना उघडकीस आल्याने शेतकरी भयभीत !#wild_attack_tiger

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -थोडक्यात -


ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या बामनगाव येथील राज्यपाल नागोसे (वय 37 वर्ष अंदाजित ) हा शेतकरी शेतात काम करीत असताना वाघाने झडप घालून ठार केले.ही घटना आज दिनांक 4 जून दुपारी 5 वा दरम्यान उघडकीस आली. 

जंगल शेजारी राज्यपाल नागोसे बामणगाव यांचे शेत असून शेतात नांगरणी करीत असतानाच्या दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने झडप घालून ठार केले.या घटनेची माहिती मिळताच मासळ जिल्हा परिषद भाजप क्षेत्र प्रमुख प्रवीण गणोरकर व गजानन गुळध्ये यांनी धाव घेत घटनास्थळी भेट दिली.
 

या परिसरातील व्याघ्र हल्य्याची चौथी घटना असून शेतकरी व मजूर वर्गात दहशत निर्माण झालेली आहे.