रानडुकराच्या हिंसक हल्ल्यात नांदा येथील शेतकरी जखमी #wild_attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रानडुकराच्या हिंसक हल्ल्यात नांदा येथील शेतकरी जखमी #wild_attack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

नांदा येथील शेतकरी के. व्यंकटेश्वरलू  वय 55 वर्ष दिनांक 8 मे रोजी सकाळी ६ वाजताचे सुमारास शेतात जात असतांना  रानडुकराने अचानक केलेल्या हिंसक हल्ल्यात जबर जखमी झाल्याने शेतात पडून होते.

राजेश भुते व सुर्यभान कामटकर या दोघांनाही के. वेंकटेश्वर यांना कोणीतरी जखमी अवस्थेत पडलेले दिसल्याने त्यांनी तात्काळ  जखमी अवस्थेत असलेले के व्यंकटेश्वरलू यांना उचलुन आणून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले  दैवबलवत्तर होते म्हणून शेतकर्‍याचा जीव वाचला.

नांदा गावालगत असलेल्या शिंदे यांच्या शेतात रानडुकरांनी हल्ला केल्याने गावातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे  वनविभागाने तातडीने मदत देऊन परीसरातील रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.