वन्यजीव ब्रेकिंग : चितळाची शिकार ; चार आरोपी ताब्यात ; सूकवासी वनक्षेत्रातील घटना #wild-life-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वन्यजीव ब्रेकिंग : चितळाची शिकार ; चार आरोपी ताब्यात ; सूकवासी वनक्षेत्रातील घटना #wild-life-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -गोंडपिपरी -

शिकारी कुत्र्यांचा मदतीने चितळाची शिकार केल्याची घटना उघळकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. वनविभागाने चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.ही घटना मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्रातील सूकवाशी बिटात घडली आहे.विशेष म्हणजे दोन महीण्यापुर्वी या वनक्षेत्रात शिकारीची घटना उघडकीस आली होती.

मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या सूकवाशी बिटातील कक्ष क्रमांक 156 मध्ये शिकारी कुत्र्यांचा मदतीने चितळाची शिकार केल्याची माहीती वनविभागाला मिळाली.माहीतीचा वनविभागाने नितेश मेश्राम,नारायण पंदीलवार,सिताराम कातलाम,शंकर कोडापे या चौघांना ताब्यात घेतले. आरोपींनी दिलेल्या माहीतीचा आधारे वनविभागाने शिकारीचे घटनास्थळ गाठले असता तिथे चितळाचे मुंडके,तूटलेले पाय आढळून आले. 

शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. काही महीण्यापुर्वी सूकवाशी बिटाला लागुनच असलेल्या वटराणा वनक्षेत्रात सांबराची शिकार झाली होती. वेडगाव येथेही शिकारीची घटना उघळकीस आली होती. धाबा वनक्षेत्राअंतर्गत शिकारीचा घटना वाढल्याने वन्यप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

वन्यजीव असूरक्षित....!

धाबा वनक्षेत्र वन्यजीवांचे महत्त्वाचा भ्रमणमार्ग समजला जातो. दूर्मिळ प्रजातीचा वन्यजीवांचा येथे आवास आहे. मागील वर्षी या वनक्षेत्रातील तिन वाघ दगावले. शिकारीचा अनेक घटना उघळकीस आल्या आहेत. वनविभागाचा कामचूकारपणामुळे वन्यजिव असूरक्षित झाल्याचा आरोप वन्यजिव प्रेमिंकडून केला जात आहे.