अन प्रकल्पग्रस्त उतरले टॉवर वरून खाली..... वाचा 👇#wcl - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अन प्रकल्पग्रस्त उतरले टॉवर वरून खाली..... वाचा 👇#wcl

Share This
वेकोलि प्रकल्पग्रस्त चढले टॉवर वर : जमिन अधिग्रहणानंतरही नौकरी नाही : लोकप्रतिनिंचे सऱ्हास दुर्लक्ष #wcl 

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती, भडंगपूर, कोलगाव, मानोली, धोपटाळा, माथरा ईत्यादी गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी वेकोलि ने अधिग्रहित केल्या आहेत परंतु नियमाप्रमाणे अजुनही त्यातील बहुतांश शेतकर्‍यांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही.

वेकोलि ने भूसंपादन करून अनेक वर्षे लोटली असुन अजुनही वेकोलिच्या कित्येक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतल्या गेले नसून वारंवार निवेदने देऊन, लहान मोठे आंदोलन करूनही ह्या प्रकल्पग्रस्तांना अजुनही कुठलाही लाभ झालेला नसल्याने शेवटी आज प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या संयमाचा बंध फुटला असुन आज सकाळी प्रकल्पग्रस्त मारोती मावलिकर, संजय बेले, विलास घटे तीन शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे.

वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक डे ह्यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाकडून जाणीवपुर्वक वेळकाढूपणा करण्यात येत असुन त्यामुळे शेतकर्‍यांच्या संयमाचा बंध फुटला असुन आज ह्या शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करीत वेकोलि प्रशासनाने लवकरात लवकर अंदाजानं 30 ते 35 दिवसांच्या आत मध्ये एग्रीमेंट पूर्ण करून समोरची प्रोसेस देखील एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. तीनही प्रकल्पग्रस्त लोक खाली उतरले आहेत.


अवघ्या तीन तासात वेकोलि प्रशासनासोबत आज टॉवर वर चढलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याकरिता प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांनी मुख्य प्रबंधक सी पी सिंग आणी खनन अधिकारी परांजपे यांचेसमेत चर्चा घडवून आणत त्या तिन्ही प्रकल्पग्रस्तांना 35 दिवसांच्या आत नौकरीत सामावून घेण्याचे लेखी पत्र घेतल्यावर सर्व टॉवर वरून खाली उतरले आहेत.