खबरकट्टा / चंद्रपूर :
दिनांक १८/०६/२०२० गुरवारला ११:३० वाजता महाकाली भुमिगत कोळसा खाणीत कामावर असतांना अविनाश ठावरी (३९) रा. महाकाली कॉलरी, चंद्रपुर यांच्या खाणीच्या आतील कोळश्याचे मोठे ढेले अंगावर पडल्याने ते किरकोड जखमी झाले.
त्यांना खाणीच्या आतील भागातुन तब्बल दिड तासानंतर १ वाजता बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लालपेठ एरीया हॉस्पिटल येथे उपचारा साठी भर्ती करण्यात आले. परंतु रात्री ८ वाजताच्या दरम्यान त्यांचा तिथेच मॄत्यु झाला. चांगला उपचार मिळाला असता तर त्याचा जिव वाचला असता.
परंतु चांगला वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मॄत्यु झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयानी व कामगार संघटनांनी महाकाली कॉलरी भुमिगत कोळसा खाणीच्या व्यवस्थापनावर लावला आहे.