खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :-
महाराष्ट्रात दिवसेंदिवस दलित लोकांन वर अत्याचारां चे प्रमाण जास्तच वाढत आहेत. लॉकडॉऊन काळात अनेक दलित बांधवा वर घ्रुण अत्याचार झाले. पण अद्यापही त्या प्रकरणात सी. बी. आय चौकशी करण्यात आली नाही.
नागपूर जिल्ह्य़ातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांने विष देऊन मारण्यात आले.शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोल वर सोडण्यात आले.
विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांना जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. बिड जिल्ह्य़ातील तीन आदिवासी लोकांनाची हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणात त्वरित लक्ष घालून यावर सी. बी. आय चौकशी करण्यात यावी आणि हत्या प्रकरणात 302 कलमे अर्तगत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, मानव कल्याण मंडळ मुंबई, सामाजिक न्यायमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले. निवेदन देताना प्रेमलाल मेश्राम, सुखदेव प्रधान,शीतल गायकवाड, अनिल कांबळे, राहुल मेत्राम, अरुण सुखदेवे, सुखराणी बन्सोड, लिना रामटेके विलास मैद, मदन शेन्डे, नरेंद्र मेत्राम, संतोष फुलझले, ज्योती कवरे, कमलेश मेत्राम लिलाधर वंजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.