ती टोळधाड नसून नाकतोड्याची पिल्ले : डॉ. नागदेवते :विदर्भात पहिल्यांदा धडकलेल्या कथित टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी : प्रत्यक्षात आढळली नाकतोड्याची पिल्ले #tol_locust_attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ती टोळधाड नसून नाकतोड्याची पिल्ले : डॉ. नागदेवते :विदर्भात पहिल्यांदा धडकलेल्या कथित टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी : प्रत्यक्षात आढळली नाकतोड्याची पिल्ले #tol_locust_attack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

विदर्भात पहिल्यांदा धडकलेल्या कथित टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी व शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी चिमूर तालुक्यातील मौजा आंमडी बेगड येथे शालिक विटाळी यांच्या शेतामध्ये डॉ. तांबे, डॉ. सवई, डॉ. बोरकर या शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. नागदेवते, डॉ.देशपांडे उपस्थित होते.तथापी,ही टोळधाड नसून नाकतोड्यांचा हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये टोळधाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृषी विभागामार्फत या किडीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या आहेत.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या भेटीमध्ये शेतात आढळून आलेली पिल्ले ही टोळधाडीची नसून ती नाकतोड्याची आहेत. त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. एकही टोळधाडीचे प्रौढ कीड पिकांवर आढळून आले नाही. त्यामुळे शेतातील कोणत्याही प्रकारच्या झाडांना व वनस्पतींना त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. तसेच या नाकतोड्याचे प्रमाण खूप कमी असल्याने यापासून शेतातील पिकाला काहीही धोका नाही. असे शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितले.