भरधाव कारच्या धडकेत तीन म्हशी जागीच ठार,एक जखमी# Three buffaloes were killed on the spot and one was injured in the collision of car - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरधाव कारच्या धडकेत तीन म्हशी जागीच ठार,एक जखमी# Three buffaloes were killed on the spot and one was injured in the collision of car

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
ब्रम्हपुरी - आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील कीन्हीं गावाजवड काल रात्रौ 8 च्या दरम्यान एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने म्हशीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन म्हशी जागीच ठार तर एक जखमी झाली.
     
मौजा सवरदंड चक येथील म्हशी नेहमी प्रमाणे जंगलात चरायला गेल्या होत्या.अचानक जोरदार वारा व पाऊस सुरू झाल्याने काही म्हशी वाट चुकल्या व त्या घरी परतल्या नाही.सदर म्हशी भटकून  ब्रम्हपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर आल्या असता MH 34  AA 6904 या कारने भरधाव वेगाने या म्हशीना धडक दिली.

वाहनांची धडक एवढि जबरदस्त होती की या अपघातात तीन म्हशी जागीच ठार तर एक म्हैस जखमी झाली. देवानंद रामचंद्र गाठोडे यांची 45 हजार रुपये किमतीची,मनोहर सखाराम बेद्रे यांची 50 हजार तर दिलीप बेद्रे यांची 30 हजार किमतीची म्हैस मरून नुकसान झाले आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.