एस.डी.ओ कार्यालयातील चालकाची आत्महत्या : शासकीय क्वार्टरमध्ये आज दुपारी घेतला गळफास #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एस.डी.ओ कार्यालयातील चालकाची आत्महत्या : शासकीय क्वार्टरमध्ये आज दुपारी घेतला गळफास #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर , ( 8 जून ) : 

उपविभागीय कार्यालय (एस. डी. ओ. ) चिमूर येथील वाहन चालक दत्ता कडके ( वय – 37 ) याने चिमूर तहसील कार्यालयाचे मागील शासकीय क्वार्टरमध्ये आज ( 8 जून ) गळफास लावून आत्महत्त्या केली. ही घटना दुपारी 2 ते 2.30 वा. च्या दरम्यान उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, दत्ता कडके हे मागील दोन महिन्यापासून कर्तव्यावर नव्हते ; पण शासकीय क्वार्टर मध्ये राहत होते. जेवणाचा डबा नेऊन देणाऱ्या व्यक्तीने ( नानाजी सातपैसे ) दुपारी दोन – ते अडीच वाजताच्या दरम्यान क्वार्टरचे दार ठोठावले. 

पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर डबेवाल्याने तहसील कार्यालयातील चपराशी यांना दत्ता आतून बोलत नाहीत, असे सांगितले. त्यावरून चपराशी देवराव शेंडे यांनी क्लार्क ला सांगितले व त्यांनी क्वार्टरमध्ये जाऊन अधिक चौकशी केली असता दत्ताचे प्रेत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसलें. त्यानंतर ही वार्ता सर्वत्र पसरली.

चिमूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. चिमूर पोलिसांनी सदर घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.