झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने वडगावात खळबळ ! #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने वडगावात खळबळ ! #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर:- 
चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृह मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास अवस्थेत एका इसमाचा मृतदेह लटकून आढळल्याने एकच खळबळ पसरली आहे.


आज सकाळी मॉर्निंग वॉक  करायला निघालेल्या नागरिकांना गळफास घेऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसतातचं तात्काळ नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहीती दिली. 


माहिती मिळताच पप्पू देशमुख यांनी पोलिसांना माहिती देत घटनास्थळी पोहचले, रक्षित मेश्राम वय (45) असे मृतकाच नाव असून तो खाजगी सुरक्षा गार्ड म्हणून शहरातील एका कार्यालयात कामावर होता व या परिसरात गेल्या 11 महिन्या पासून किरायाने रहात होता. 


प्राथमिक चौकशीत घरगुती वादातून आत्महत्या केल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचून पंचनामा केला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.