लोहाराच्या जंगलात आढळला मृतदेह : झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने आत्महत्या की घातापात? #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोहाराच्या जंगलात आढळला मृतदेह : झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने आत्महत्या की घातापात? #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात वृत्त - 

चंद्रपूर शहरालगत असलेल्या लोहारा गावातील जंगल परिसरात काल दुपार नंतर एका झाडाला इसमाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

गुरुदास शेडमाके असे मृत इसमाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिक लोहारा गावातील जंगल परिसरात दुपारच्या सुमारास गेले असता त्यांना एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

याची माहिती गावातील नागरिकांना देण्यात आली.त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत..