भद्रावतीत एकाच दिवशी दोन आत्महत्या : योगायोग दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी साडीने घेतला गळफास #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भद्रावतीत एकाच दिवशी दोन आत्महत्या : योगायोग दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी साडीने घेतला गळफास #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती -

शहरातील गौतम नगर येथे विवाहितेची तर सुरक्षा नगर येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून पोलिसांनी या घटनेने बाबत मर्ग दाखल केला आहे.

भाग्यश्री रुपेश रामटेके वय 24 वर्ष राहणार गौतम नगर भद्रावती असे गळफास घेऊन मृत झालेल्या विवाहितेचे नाव असून घटनेच्या काही दिवसापूर्वी तिच्या नवऱ्यासोबत घरगुती भांडण झाले होते यात ती गेल्या काही दिवसापासून एकमेकाशी बोलत नव्हते याच गोष्टीचा मनात राग धरून तिने रविवारच्या रात्रो दरम्यान छताला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेची माहिती नवऱ्याला कडताच त्याने भद्रावती पोलिसांना माहिती दिली.

तर दुसर्‍या घटनेत राम कृष्ण बापूराव डाहुले वय 70 वर्ष राहणार सुरक्षा नगर असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव असून हा गेल्या काही वर्षापासूनआजारी होता वैद्यकीय उपचार करूनही प्रकृती ठिक होत नसल्याने त्याने आजाराला कंटाळून रविवारला घरासमोरील झाडाला साडीने गळफास बांधून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या दोन्ही घटनेचा भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.