विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -

सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. योगेश वसंत राऊत (वय ३० ) असे मृताचे नाव असून आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे.

चकपिरंजी शेत शिवारात आयटीआय च्या बाजूला वालकर यांच्या शेतातील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहीरीत योगेश वसंत राऊत या तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहीती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुमारसिंग राठोड , सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के , पोहवा.चंद्रकांत कन्नाके , पो शि. प्रफुल्ल आडे घटनास्थळी दाखल झाले.

मयत तरुण हा गोसेखुर्दच्या पाठावर रोजंदारीवर जात होता . पण काही दिवसापासून मानसिक संतुलन बिघडल्याने त्याला घरातील सदस्यांनी दोन तिन दिवसा पासून सावली येथील सरकारी दवाखान्यात भरती केले असता , मयत तरुणाचे दवाखान्यात मानसिक संतूलन ठिक नसल्याने अरेरावी चाळे करण्यामूळे आज सकाळी ६.३० वाजता सुट्टी घेऊन घरातील सदस्यांनी मयत तरुणाला घरी नेले असता , शौचालयाच्या बहाण्याने तो बाहेर शेतातील विहिरीत जाऊन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात पत्नी ,मुलं ,आई-वडील ,भाऊ बराच आप्त परिवार असून , गावात सर्वत्र शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पुढील तपासणीसाठी तरुणाचे शव सावली सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून पुढील तपास सावली पोलिस स्टेशन ठाणेदार कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के , पोलिस हवालदार चंद्रकांत कन्नाके , पोलिस शिपाई प्रफुल्ल आडे करत आहेत.