🔰श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज येथे करोडोचे कर्ज शिक्षकांच्या माथी
🔰शिक्षकांनी कोणतेही कर्ज न घेताच पगारातून इएमआय कपात
🔰बोगस सोसायटी कागदोपत्री उघडून अनेक कर्मचार्यांच्या सह्या घेवून कर्मचार्यांच्या नावे कर्जाची उचल
🔰तांत्रिक शिक्षण शुल्क समितीसोबतच पालकांकडूनही ज्यादा शुल्क आकारणी करून फसवणूक
🔰श्री साई तंत्रनिकेतन समन्वय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार -आर्थिक पिळवणूक थांबविण्याची मागणी
चंद्रपूर शहरातील एम डी येरगुडे मेमोरियल शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री. साई पॉलिटेक्निक येथे शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या नावावर करोडोचा कर्ज घोटाळा समोर आला आहे.
या गडबडीत राज्य सरकार च्या तांत्रिक शिक्षण शुल्क निर्धारण समिती ला सुद्धा बेकायदेशीर पणे करोडो चा चुना लावल्याचे उघड झाले आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतना बद्दल खोटी माहिती सादर करून शिक्षण शुल्कात चुकीच्या पद्धतीने वाढ करून विद्यार्थ्यांनाही लुटण्यात आले असल्याचा खुलासा साई पॉलिटेक्निक द्वारे बँक ऑफ महाराष्ट्र येथे कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज उचल करते वेळी सादर केलेल्या कागदपत्रातून समोर आला असून सध्या तरी 35 शिक्षक व 24 शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसोबत धोकाधडीने परपस्पर कर्ज उचल केल्याचे समोर आले आहे. उपलब्ध कागद्पत्रांनुसार हा गंभीर प्रकार 2014 पासून सुरु असल्याचे कळते.
या कर्ज प्रकरणाकरिता संस्थेकडून नवीनतम पद्धतीने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नावे ज्यास्त वेतन देयके राज्य शासनाकडे कागदोपत्री सादर करून व त्या आधारावर कर्जाची उचल करून त्याचे हप्ते नियमित वेतनातून कापण्यात येत आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही शिक्षक किंवा कर्मचाऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र कडे अश्या कोणत्याही कर्जाची मागणी किंवा उचल केली नसल्याचे साई पॉलिटेक्निक संमन्वय समितीचे म्हणणे आहे.
या ठिकाणी बोगस सोसायटी कागदोपत्री उघडून अनेक कर्मचार्यांच्या सह्या घेवून कर्मचार्यांच्या नावे कर्जाची उचल केल्याचे दाखविले आणि कर्मचार्यांवर दबाव तंत्राचा उपयोग करून भाग पाडून या गैर प्रकारात शिक्षकांचे दोन तृतीयांश वेतन कर्ज हप्त्यांच्या नावावर कापण्यात येत असल्याचा कागदोपत्री उल्लेख आहे.
प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांनी साई सोसायटी किंवा कुठेही कर्ज घेतलेले नसून कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून मोठया प्रमाणात कर्ज उचल करून व या बाबत शिक्षक व कर्मचाऱ्यांना अंधारात ठेऊन धोकाधडी केली असल्याने अशा गैरकारभार करणार्यावर कारवाई करावी अशी मागणी श्री साई तंत्रनिकेतन समन्वय समितीचे अध्यक्ष -राकेश टोंगे, उपाध्यक्ष- भूपेश पिपंळशेडे, सचिव-राजू गौरकार, जिल्हा सारती असोसिएशन सचिव-श्री.सचिन रोडे,जिल्हा सारती असोसिएशन अध्यक्ष-श्री. सचिन ढेगळे,जिल्हा सारती असोसिएशन उपाध्यक्ष श्री.गणेश काकडे व सारती असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री. देवेंद्र सायसे, अध्यक्ष श्री.योगेश ढगे यांनी एका निवेदनातून केली आहे.
लवकरच वाचा....
भाग 2 : श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज येथे कश्या पद्धतीने शिक्षकांच्या नावे करोडोचे कर्ज उचलल्या गेले (सविस्तर विश्लेषण )
भाग 3 : माहिती अधिकारात कर्जाबाबत माहिती मागितल्याने कर्मचारी निलंबित
भाग 4 : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अवघ्या 4 किलोमीटर वर असलेल्या श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज ला भेटायला लागतात तब्बल 45 दिवस (लॉकडाऊन चा संबंध नाही )