गडचांदूर येथे कोरोना बाधित आढळल्याने सदर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची शाखा आहे. परंतु बँकेच्या संदर्भातील कामकाज व शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी बँकेचे कामकाज आवाळपुर शाखेत सुरू आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणारे पिक कर्ज या संबंधित गडचांदूर शहरालगत असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवाळपुर या शाखेत अर्ज स्विकारल्या जातील.स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडचांदूर येथे जवळपास 30 ते 40 गावे संलग्न आहेत. या गावांमधील शेतकऱ्यांना बँकेच्या कामकाजाचा संबंधात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवाळपूर या शाखेत व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे बँकेची कोणतीही व्यवहार ठप्प नाहीत.
शेतकऱ्यांनी, बँकेच्या खातेदारांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेत जाऊन कामकाज पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.