वाळू तस्करीत भद्रावतीच्या कृउबास सभापती सह चौघांना अटक # दोन हायवा ट्रक सहित रेती साठा जप्त #sand_trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाळू तस्करीत भद्रावतीच्या कृउबास सभापती सह चौघांना अटक # दोन हायवा ट्रक सहित रेती साठा जप्त #sand_trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


शहरातील वाळू सप्लाय व्यवसायिक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे यांच्यसह अन्य तीन जणांना भद्रावती पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन व  तस्करी प्रकरणात अटक केली असून त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 


या घटनेमुळे शहरातील वाळू क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून भद्रावती तालुक्यात अवैध रेती प्रकरण चांगलेच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एमआयडिसी, तेलवासा परिसरात तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी यांनी 225 ब्रास तर वेकोलीच्या नवीन कुनाडा खदान परिसरात 150 अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला होता. 


हा अवैध वाळू  साठा नेमका कुणाचा यासाठी याचा तपास भद्रावती पोलिसांकडे देण्यात आला होता तेव्हापासून या वाळू साठा करणाऱ्या व्यवसायिकांची चौकशी सुरू होती. पोलीस तपासात हे सर्व अवैध वाळूसाठी वासुदेव ठाकरे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाळू व्यवसायिक वासुदेव ठाकरे, संतोष चिकराम, किरण साहू व अनिल केडाम यांना अटक करण्यात आली. 


या कारवाईत दोन हायवा ट्रकही जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात मस्के यांनी केली.