⁉️ज्वलंत ब्रेकिंग : जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कामडी यांचे वाळू तस्करांसोबत साटेलोटे???? : जिल्हाधिकारी खेमनार यांनीं काढले चौकशी आदेश :कामडी यांच्या विरुद्ध मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीची चौकशी सुरु असताना या नव्या चौकशीने प्रशासनात खळबळ !!! : अतिरिक्त जिल्हाधिकारी विधुत वरखेडकर करणार चौकशी : काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांची तक्रार #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

⁉️ज्वलंत ब्रेकिंग : जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कामडी यांचे वाळू तस्करांसोबत साटेलोटे???? : जिल्हाधिकारी खेमनार यांनीं काढले चौकशी आदेश :कामडी यांच्या विरुद्ध मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीची चौकशी सुरु असताना या नव्या चौकशीने प्रशासनात खळबळ !!! : अतिरिक्त जिल्हाधिकारी विधुत वरखेडकर करणार चौकशी : काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांची तक्रार #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव मागील वर्षी उच्च न्यायलायच्या आदेशानंतर तातडीने रद्द करण्यात आले व जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वारेमाप वाहतूक सुरु झाली.हे लिलाव रद्द झाल्यापासून  जिल्ह्यातील प्रत्येक लहान सहन नाले -नद्या तस्करांनी अक्षरशः खोदून काढल्या. 

वारंवार तक्रारी करूनही तस्करीच्या तुलनात्म खनिकर्म विभागाची कार्यवाही शून्य दिसली. अनेक मोठया प्रकरणात सऱ्हास कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप सामान्यांकडून होत असताना यामागे राजकीय पाठबळ व प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या हाताची खाज कारणीभूत असूनही आपलेच ओठ आपलेच दात या उक्तीप्रमाणे आजवर दातांची मिठी बंद ठेवण्यात येत होती. 

मात्र आता वाळू तस्कर, गिट्टी क्रेशर मालक आणि वेकोलीच्या अधिकाऱ्यांची संगणमत करून खुद्द जिल्हा खनीकर्म अधिकारी गजानन कामडी यानीच कोट्यवधी रुपयांचा राज्याच्या महसूल बुडविला असल्याची तक्रार चन्द्रपुर शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नंदू नागरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली असता या तक्रारीची दखल घेत कामडी यांची सर्वकश चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

नवनियुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विधुत वरखेडकर या गजानन कांमंडी यांची चौकशी करणार आहे. गजानन कामड़ी यानी वाळू तस्करांकडून जप्त केलेल्या वाळूचा रीतसर लिलाव न करता तस्करासोबत संगनमत करुण त्यांना कंत्राट केल्याचे नागरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

यापूर्वी सुद्धा जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या बाबतीत मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती व करोडोंची किंमत असलेल्या बंगल्याची मिळकत चौकशी चौकशी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची 2 महिन्यांपूर्वी नागपूर जिल्हापरिषद येथे बदली झाल्याने थंडबस्त्यात आहे. मात्र जुने चौकशी प्रकरण शमले नसताना आता या नव्या  चौकशी मुळे गजानन कामड़ी व वाळू तस्करांच्या अडचणी  वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.