कुणी ही यावे अधिकारी बनून जावे तोतया अधिकारी वसुली प्रकरणात गुन्हे दाखल होणार काय ?#sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कुणी ही यावे अधिकारी बनून जावे तोतया अधिकारी वसुली प्रकरणात गुन्हे दाखल होणार काय ?#sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बघा विडिओ त्या तोतया खनिकर्म अधिकारी महिला व वाळू तस्कर आपापसात बोलताना 👇

घुग्गुस वढा येथील वर्धा नदीच्या घाटावरील रेती चोरी गेल्याची तक्रार पटवारी दिलीप पिल्लई यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला रेती चोरीची तक्रार दाखल करताच तस्करांनी आपला मोर्चा वढा घाटाकडे वळविला असता शुक्रवारी 19 जूनला सकाळी  वढा येतील रेती घाटावर MH34  BF 4449 या वाहनातून आलेल्या महिलेने आपण खनिकर्म विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून अवैध रेती तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकाकडून पन्नास हजार रुपये वसुली केल्याची चर्चा परिसरात होत होती.

आता याप्रकरणातील विडिओ सोशल माध्यमांवर फिरत असून यामध्ये स्कॉर्पिओ वाहनांमध्ये बसलेली लाल हिरव्या रंगाच्या ड्रेस परिधान केलेली महिला व परिसरातील रेती तस्कर हितेश लोंढे, मोबिन खान, शरद बोरकर सह अन्य तस्कर रेती तस्करीत असलेले वाहन सोडून देण्यासाठी सेटिंग करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मात्र अजून ही याप्रकरणातील तोतया महिला अधिकारी त्यांचे सहकारी व रेती तस्करांवर कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही.जिल्ह्यात एका मोठ्या अधिकाऱ्यांच्या नावावर अवैध वसुली करण्याचे धाडस एक तोतया अधिकारी करतो व त्यांच्याविरोधात अजून पर्यंत तक्रार होत नाही याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेती तस्करांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनां दिले असून त्याचे परिणाम स्वरूप अजयपूर, भद्रावती  येथील रेती तस्करीत शामिल राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

वढा नदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरी करून गजानन वरारकर यांच्या शेतात जमा करण्यात आलेली असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतांना देखील कारवाई का होत नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.