😱 सतर्क ब्रेकिंग : सावधान : खनिकर्म अधिकारी असल्याची बतावणी करून अवैध वाळू तस्करांकङून वसुली👇वाचा सविस्तर - व्हा सतर्क 👇 ◾ घुग्घुस परिसरातील वढा घाटावरील घटना ◾️⁉ ती महिला व " झांबरे ब्रदर्स " लिहिलेली स्काॅर्पीओ गाडी बल्लारपूर येथील असल्याची चर्चा ▶ बघा 👉 सोशल मीडिया वरील वायरल विडिओ #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

😱 सतर्क ब्रेकिंग : सावधान : खनिकर्म अधिकारी असल्याची बतावणी करून अवैध वाळू तस्करांकङून वसुली👇वाचा सविस्तर - व्हा सतर्क 👇 ◾ घुग्घुस परिसरातील वढा घाटावरील घटना ◾️⁉ ती महिला व " झांबरे ब्रदर्स " लिहिलेली स्काॅर्पीओ गाडी बल्लारपूर येथील असल्याची चर्चा ▶ बघा 👉 सोशल मीडिया वरील वायरल विडिओ #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्गुस प्रतिनिधी -

उत्खनन अधिकारी असल्याची बतावणी देऊन रेती तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या एका तोतया महिलेलेचा व्हिडिओ वायरल झाला असून, वसुलीची मोठी बातमी पुढे आली आहे.

घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी आपला मोर्चा वढा नदीच्या रेती घाटांवर वळविला आहे. घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा गावाच्या रेती घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु आहे.

हिच संधी साधुन एका महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच ३४ बीएफ ४४४९ मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. 

पोलीस पाटील येताच त्यांच्या सोबत वाळू घाटावर  जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. तेव्हा घुग्घुसचे तीन वाळू  तस्करांनी मध्यस्ती केली ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला. मात्र या घडलेल्या नाट्याची चर्चा घुग्घुस येथे पसरताच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी " झांबरे ब्रदर्स " असे लिहून असलेल्या स्कॉर्पिओ चा शोध घेतला असता ही गाडी बल्लारपूर येथील असल्याचे चर्चेत आहे. 

भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांचे आदेश मिळताच लवकरच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी भ्रमणध्वनीवर दिली. 

वढा नदीच्या पात्रा तुन हजारो ब्रास रेती चोरीस गेल्याने शासनाच्या लाखो रुपयाचा महसुल पाण्यात बुडाला आहे. रेती तस्करांनी गजानन वरारकर यांच्या शेतात मोठे रेतीचे साठे तयार करुन ठेवले आहे.

वढ्याचे उपसरपंच संतोष भोस्कर यांनी हजारो ब्रास रेती चोरीस गेल्याने गावातून होणारी रेती तस्करी बंद करण्याची मागणी केली आहे.