नाभिक समाज बाबतीत सोशल मीडिया वर आक्षेपार्ह विधाने थांबवा - इंजि.देवेंद्र वाटकर (महाराष्ट्र नाभिक महामंडळ बल्लारपूर ) :समाज बांधवांच्या भावना दुखावल्यास तीव्र पडसादसलुन व्यवसायकांचा विकृतींचा निषेध व्यक्त करत इशारा #salon-community-not-to-be-targeted-on-social-media - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नाभिक समाज बाबतीत सोशल मीडिया वर आक्षेपार्ह विधाने थांबवा - इंजि.देवेंद्र वाटकर (महाराष्ट्र नाभिक महामंडळ बल्लारपूर ) :समाज बांधवांच्या भावना दुखावल्यास तीव्र पडसादसलुन व्यवसायकांचा विकृतींचा निषेध व्यक्त करत इशारा #salon-community-not-to-be-targeted-on-social-media

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

नाभिक समाज बाबतीत विकृत मानसिकतेचा परिचय देत आक्षेपार्ह विधान फेसबुक वर केल्याबद्दल आज दि.९/६/२०२० रोज मंगळवार ला महाराष्ट्र नाभिक महामंडळ बल्लारपूर शाखा च्या वतीने बल्लारपूर तालुका अध्यक्ष इंजि.देवेंद्र वाटकर यांच्या नेतृत्त्वात तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी व सलुन व्यवसायकांनी निषेध केला.

मागील काही दिवसांपासून नाभिक समाजा बद्दल वारंवार मन दुखावणारे विधान/मजकूर सोशल मिडिया वर पोस्ट करण्यात येत आहे ज्याचा नेहमीच शांत पद्धतीने न्हावी समाज विरोध करत आहे.प्रत्येक वेळी समाज बांधवांचे मन दुखावने कसल्याही मार्गाने योग्य नाही व यापुढे असे घडल्यास याचे तीव्र पडसाद उमटेल. 

या वेळी  समाजातील शिष्टमंडळ यांनी जिल्हाधिकारी यांना बल्लारपूर तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. 

या प्रसंगी श्री प्रशांत वाटकर सचिव,श्री कृष्णा ऐंगंदलावार उपाध्यक्ष,श्री मनोज दयालवार उपाध्यक्ष,श्री गणेश वनकर युवा कार्यकर्ता,श्री सुभाष शर्मा, श्री सत्यम मामा,श्री जीवन नागतुरे,श्री मिथुन हनुमंते,श्री संजु  ऐंगंदलावार,श्री नारायण कोत्तगट्टुवार,बालय्या कोत्तगट्टुवार, श्री महेश मुरारी,श्री रवि कोत्तगट्टुवार,श्री कोमराय्या अण्णा, श्री रघुपती अण्णा, यश, नवनाथ,हनुमान, अशोक धांडे,सुरेश,पप्पू जमपलवार व समस्त समाज बांधव उपस्थित होते.