जड वाहनाने दुचाकीस्वारास उडविले :महेंद्र उध्दव लोखंडे, चंद्रपूर यांचा बामणी येथे अपघातस्थळी मृत्यू #Road_accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जड वाहनाने दुचाकीस्वारास उडविले :महेंद्र उध्दव लोखंडे, चंद्रपूर यांचा बामणी येथे अपघातस्थळी मृत्यू #Road_accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

आज सायंकाळी 5:00 वा च्या दरम्यान बल्लारपुर शहरा लगत बामणी येथे गुरुनानक साइन्स कॉलेज परिसरातील चौकात अपघातात महेंद्र उध्दव लोखंडे वय - 52 वर्ष रा. बालाजी वार्ड गोपालपुरी चंद्रपुर यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. 

लोखंडे हे  कामानिमित्त बल्लारपुर शहरात आले  असता आपले काम आटोपुन परत जात असतांना गुरुनानक साइन्स कॉलेज परिसरातून आपल्या दुचाकी हीरो स्प्लेंडर क्र MH 34 - AW 3697 ने वळण घेत असताना अवजड वाहन ट्रक क्र TS 03 UA 4489 ने आणखी एका ट्रक ला टोइंग करून आपले वाहन नेत असताना सदर दुचाकी स्वारास धड़क दिली.

या धड़केत सदर इसम जागीच ठार झाल्याची माहिती असून सदर घटनेचा तपास बल्लारपुर पोलिस करीत असून सदर वाहन पोलिस स्थानक परिसरात जमा करण्यात आले आहे व या संबंधिचा पुढील तपास सुरु आहे.

मृतक महेन्द्र लोखंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष असल्याचे कळते.