नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत बाम्हणी येथे दुचाकी स्वार युवकाने चारचाकी गाडीला धडक दिल्याने दुचाकी स्वार वरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बाम्हणी येथे काल दि.6जून रोजी सायंकाळी घडली.
जगदीश विनोद ठाकरे वय 30 व विनोद कान्हुजी मुळे वय 35 रा निपन्द्रा ता.सावली असे जखमीचे नाव असून ते आज सायंकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील पाचगाव इथून स्वगावी येत असताना बाम्हणी गावा जवळ आल्यानंतर पाऊसाने सुरूवात केली तेव्हा रस्त्या
लगतच्या झोपडीत लपण्याच्या धुंदित समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहणाला धडक दिली.