ट्रक च्या धडकेत युवक जागीच ठार #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ट्रक च्या धडकेत युवक जागीच ठार #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली असून ट्रक चालकास तात्काळ अटक करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती प्रमाणे दुचाकीस्वार कुणाल विलास नन्नावरे (वय 16 वर्ष) हा दुचाकी स्लिप झाल्याने खाली पडला तेव्हा त्याच्या डोक्यावरून हायवा ट्रक गेल्याने अपघातात ठार झाला असून एक जखमी झाला आहे.

फिर्यादी अमोल अंबादास ननावरे (वय 23 वर्ष) ताडगाव ता. समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील हा आपल्या क्र. MH X 0695 दुचाकीने सोबत कुणाल विलास ननावरे याला सोबत घेऊन चिमूर कडे येत असताना लोखंडी पुलाजवळ दुचाकी स्लिप झाल्याने पडले तेव्हा माग हुन निष्काळजीपणा व भरधाव पणे हायवा ट्रक क्रमांक MH -40 Bl- 8663 या ट्रक खाली पडलेल्या कुणाल च्या डोक्यावरून गेल्याने जागीच मरण पावला तर दुसरा जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

हायवा ट्रक पोलिसांनी पकडले असून सदर ट्रक चालक याचे विरुद्ध कलम 279, 337,304 अ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रक चालक महेंद्र अशोक चावट रा. गाणगापूर ता.उमरेड जी नागपूर यास अटक करन्यात आली असून  अधिक तपास सुरु आहे.