बल्लारपूर -चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात : चालक घटनास्थळीच मृत,दुसरा गंभीर जखमी #road-accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर -चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात : चालक घटनास्थळीच मृत,दुसरा गंभीर जखमी #road-accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ माहामार्गावर ट्रक क्र.AP 01W- 4422 उभा असलेल्या ट्रक ला  मोटरसायकलने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली  आहे.
 
चंद्रपूर कडे जाताना मोटर सायकल क्रमांक. MH 34 BP 2927 उभा असलेला ट्रक ला धडक दिली. ही घटना सकाळी 7:30 ते 8:00 चे दरम्यान घडली असून या अपघातत सुमित विनोद पुरी (16) रा. कन्नम नगर वार्ड, बल्लारपूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गुड्डू मेश्राम (16) रा. कन्नम नगर वार्ड, बल्लारपूर याला गंभीर जखमी असल्या मुळे चंद्रपूर येथे उपचार सुरु आहे . पुढील तपास बल्लारपूर पोलिस करत आहे.