अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार चंद्रपूर- आदिलाबाद महामार्गावरील घटना #road-accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार चंद्रपूर- आदिलाबाद महामार्गावरील घटना #road-accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना-कोरपना कडून लोनी गावाकडे जात असणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीररीत्या जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना मंगळवार ला सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास लोणी फाटा जवळ च्या नाल्याच्या पुलावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, मृतक संतोष गावडे (३२) रा. हातलोणी, हा आपल्या दुचाकी क्र एम एच ३४ यु ७२३१ने कोरपना येथून लोणी येथे जात असताना अज्ञात वाहनाची जबर ठोस दुचाकीला बसल्याने  डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच मृत पावला. 

घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम, महेंद्र वासनिक , पोलीस कर्मचारी बन्सीलाल कुडावले, विनोद पडवाल,रमेश वाकडे गजानन चारोले,सुधीर तिवारी, संजय शुक्ला,राजू चीताडे, प्रकाश ईखारे , रामचन्द्र पुष्पपोल आदी घटनास्थळी दाखल झाले. त्याला  ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरुण गुरणुले यांचे मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.