राजुरा बामणी रोडवर भीषण अपघात : मृतक : निलेश कोरेवार - जखमी : शांताराम जुमनाके जखमी #road-accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा बामणी रोडवर भीषण अपघात : मृतक : निलेश कोरेवार - जखमी : शांताराम जुमनाके जखमी #road-accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा बामणी रोडवर  आज सकाळी 12:30 वाजताच्या दरम्यान दुचाकीला भरधाव वाहनाने ठोस दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एक इसम जागेवरच मृत झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. 



चंद्रपूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर येथे गट सचिव म्हणून कार्यरत असलेले निलेश कोरेवार ,आणि शांताराम जुमनाके हे दुचाकीने बल्लारपूर कडे जात असल्याचे समजते दरम्यान उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनांची जबर धडक बसली यात निलेश कोरेवार याचा जागीच मृत्यू झाला तर शांताराम जुमनाके जखमी झाले.

माहीत होताच राजुरा पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून शांताराम जुमनाके या जख्मीला राजुरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून मृतकाचे शव शवविच्छेदनास नेण्यात आले आहे पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.