कार्डधारकाचा ठसा घेतला, राशन मात्र दिलाच नाही.◾️कोलारी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा गैरप्रकार #rashan_card - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कार्डधारकाचा ठसा घेतला, राशन मात्र दिलाच नाही.◾️कोलारी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा गैरप्रकार #rashan_card

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :- 

ब्रम्हपूरी तालुक्यातील कोलारी येथिल स्वस्त धान्य दुकानचालकाने कार्डधारकाचा पास मशीन वर अंगठ्याचा ठसा घेतला, त्यानंतर पावतीही निघाली.मात्र या महिन्यात तुमचे राशन आलेले नाही म्हणून तुम्हाला राशन मिळणार नाही. असे बोलून लाभार्थ्याला  आल्यापावली तांदूळ न देता वापस पाठवण्यात आल्याचा प्रकार कोलारी येथिल शासकीय स्वस्त धान्य दुकानात घडला. कार्डधारक लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याने या प्रकाराची तहसील कार्यालयात अन्नपुरवठा विभागात तक्रार देऊन चौकशी करून दुकानदारावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
 
येथिल प्रज्ञा महीला बचत गटाला शासकीय स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला .गटातील महीला सदस्य मिळून धान्य वाटप करतात.आता  या स्वस्त धान्य दुकानातून अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर संपूर्ण देश लाकडाऊन करण्यात आले आहे.त्यामूळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला.हातावर आणून पोटावर खाणाऱ्याचे हाल होत आहेत.त्यामूळे  सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्यान योजने अंतर्गत तिन महीने प्रत्येक गरीब कुटुंबाला  प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ व एक किलो दाळ वितरण केल्या जात आहे.

मात्र या दुकानातून शासकीय नियमानुसार धान्य वाटप न करता अनेक कार्डधारकांची फसवणूक करुन शिल्लक धान्याचा काळाबाजार होत आहे.स्थानिक कार्डधारक विवेक रत्नाकर शिलार यांना एप्रिल महिन्यात पंचेवीस कीलो मोफत धान्य मिळाले. मात्र मे महिन्यात ते धान्य  घेण्याकरीता गेल्यानंतर त्यांचा अंगठ्याचा ठसा घेण्यात आला.यावेळी त्यांच्या धान्याची पावतीही निघाली.मात्र राशनच मिळाला नसल्याने कार्डधारकाची स्वस्त धान्य दुकानदाराकडून फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

त्यामूळे कार्डधारकाने ब्रम्हपूरी तहसील कार्यालयात तक्रार केली. स्वस्त धान्य दुकानची चौकशी करून संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कार्डधारकांना त्याच्या उचल केलेल्या धान्याची पावती न देणे.शासकीय नियमाप्रमाणे धान्य वाटप न करणे,दुकानात शिल्लक असलेले धान्य व्यापाऱ्यांना जादा दराने विकने असे अनेक गैरप्रकार  करून धान्याचा काळाबाजार केल्या जात आहे.स्वस्त धान्य दुकानदारांकडून कार्डधारकांची चक्क लुबाडणूक केल्या जात आहे.त्यामुळे संबंधित विभागाने चौकशी करून स्वस्त धान्य दुकान चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य आणायला गेलो.दुकानदाराने पाॅस मशीन वर ठसा लावायला सांगितला.ठसा लावल्यानंतर पावती निघाली. त्यानंतर राशन न देता तूमचा राशन यावेळी आलेला नाही म्हणून मला वापस पाठवण्यात आला.पावतीची मागणी केली असता पावती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
-विवेक शिलार (ग्राहक)