चंद्रपुर येथील दाताळा येथे नवीन केबल पुलाचे बांधकाम प्रगती पथावर आहे.हा पुल पूर्ण झाल्यावर चंद्रपुर शहराकड़े नवीन ओळख तसेच वास्तुकलेचा उत्तम नमूना म्हणून पाहिले जाईल.म्हणजे चंद्रपुर शहराची निश्चितच भव्यता वाढेल.
आज हे चंद्रपुर जेवढे विविध साधनसंपत्ती अभयारण्ये, वनसमृद्धी ने नटलेला आहे तेवढाच या शहराचा इतिहास सुद्धा वैभवशाली आहे.या शहराचे नाव राजमाता हिराई च्या काळात चांदागढ़ असे होते.रानी हिराई ही गोंड राजा विरशहा यांची पत्नी होती.राजा वीरशहा यांच्या मृत्युनंतर रानी हिराई ने सन् 1704 ते 1719 पर्यन्त चांदागढ चा यशस्वी कारभार बघितला.
याच राजमाता हिराई ने शहरात प्रसिद्ध महाकाली मंदिर,अंचलेश्वर मंदिर,एकविरा मंदिर यांची निर्मिति केली.व एक राजकीय तसेच आध्यात्मिक जोड या शहराला दिली.राजमाता हिराई ने त्याचे पती राजे वीरशहा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक निर्माण केले.आज हेच स्मारक शहराची ओळख बनले आहे.
अश्या प्रकारे चंद्रपुर शहराची निर्मिति ते विकास यांचा विचार केले असता राजमाता हिराई चे योगदान विसरता येणार नाही.
दाताळा येथील पुलाला राजमाता हिराई यांचे नाव देऊन त्यांचा आणि महिला वर्गाचा योग्य सन्मान केल्या प्रमाणे होईल व शहराच्या इतिहासाला नवीन उजाळा मिळण्यास मदत होईल म्हणून दिनांक 22/06/20 ला मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुलभाऊ बालमवार यांच्या नेतृत्वात् मनविसे शहर अध्यक्ष नितिनभाऊ पेंदाम यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली.