रस्त्यावर पाणी साचल्याने महामार्ग एक तास ठप्प :चंद्रपूर -आदीलाबाद महामार्ग ; सोनुलीं जवळ साचले पाणी #rainwaterwater - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रस्त्यावर पाणी साचल्याने महामार्ग एक तास ठप्प :चंद्रपूर -आदीलाबाद महामार्ग ; सोनुलीं जवळ साचले पाणी #rainwaterwater

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर- कोरपना -


कोरपना - चंद्रपूर ते आदिलाबाद महामार्गाची सद्यस्थितीत अत्यंत दुरवस्था झाली आहे. यातच मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने हा मार्ग तब्बल एक तास ठप्प राहाला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहनाच्या रांगाच्या रांगा लागल्या.

चंद्रपूर - आदिलाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर 24 तास मोठ्या प्रमाणात ज डवाहतूक चालते. यामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावरच्या मोठ मोठ्या खड्ड्यामुळे तारेवरची कसरत वाहनधारकांना करावी लागते. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

निव्वळ तात्पुरती डागडुजी करून रस्त्याचे काम केले जात असल्याने खड्ड्यात पावसाचे पाणी साचले जात आहे. सद्यस्थिती त कोरपना तालुका हद्दीतील गडचांदूर ते कोरपना पर्यंत अनेक मोठ मोठे खड्डे पडल्याने बऱ्याचदा वाहतूक प्रभावित होते आहे. याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी वाहनधारकांकडून होते आहे.