रेल्वे रूटवर ट्रक फसल्याने :वाहतूक ठप्प #railway-traffic-jam - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेल्वे रूटवर ट्रक फसल्याने :वाहतूक ठप्प #railway-traffic-jam

Share This
   खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :-

ब्रम्हपुरी -आरमोरी रोडवर रेल्वेचा रूट आहे. आज सकाळी 8 च्या सुमारास आरमोरी कडे जाणारा ट्रकची रेल्वे च्या रूटवरच हायवा ट्रकचे पट्टे तुटल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर गाड्यांचे मोठी लाईन लागल्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. 

काही वेळाने पोलीस विभागाचे वाहतूक पोलीस येऊन येणारा जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ट्रकचे पट्टे तुटल्यामुळे रेल्वे फाटक वर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली होती. सदर गर्दीही शिवाजी चौकापासून तर अमराई पर्यंत जाम  लागलेली होती. 
                  

रेल्वे रुटच्या दोन्ही बाजूला असलेल्या ब्रेकर मुळे बरेच अपघात झालेले आहेत. त्या ब्रेकर वर पांढऱ्या रंगाचा पट्टा मारून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. किंवा  सदर ब्रेकची ऊंची  कमी करण्यात यावी. सदर रस्त्याने नेहमीच प्रवाशांची गर्दी असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे.