अखेर वाळू तस्कर सचिन कत्याल वर गुन्हा दाखल : तस्करीत सापडलेल्या जेसीब व हायवा मालकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांच्या मागणीला यश #prahar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर वाळू तस्कर सचिन कत्याल वर गुन्हा दाखल : तस्करीत सापडलेल्या जेसीब व हायवा मालकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांच्या मागणीला यश #prahar

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाळूतस्करी विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात वाळूतस्करांविरोधात कारवाई करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. शुक्रवारी रात्री प्रशासनाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत काँग्रेसचा युवा नेता सचिन कत्याल याचे नाव समोर आले आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेले वाहन कत्याल यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली. मात्र, त्यात कत्याल यांचा समावेश नाही.

शुक्रवारी रामनगर पोलिसांनी अजयपूरजवळ अंधारी नदीतील वाळूतस्करीची मोठी कारवाई केली. यात जेसीबी वाहन (क्र. एमएच. 34 एपी. 3433) आणि हायवा ट्रक (क्र. एमएच एएम. 3664) या वाहनांना जप्त करण्यात आले आहे. या वाहनांचे चालक तुळशीराम देवतळे आणि आदिल खान यांनाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली. सोबत 77 हजार रूपये किमतीची 31 ब्रास वाळू, असा एकूण 25 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

यातील जेसीबी हे काँग्रेसचा युवा नेता सचिन कत्याल याच्या नावाची असल्याची माहिती समोर आले होते  तर हायवा ट्रक हा इलियास खान या व्यक्तीच्या नावे  आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार, कत्यालने हा जेसीबी 2015 ला घेतली. परिवहन विभागात त्याची 15 डिसेंबर 2015 ला नोंदणी करण्यात आली. त्याचा चेसिस क्रमांक IMOP031 असा आहे. 

वाळूतस्करीत खुद्द काँग्रेसचा युवा नेत्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली होती व विशेष म्हणजे काँग्रेसमध्येच असलेल्या चंद्रपुरातील एका नगरसेवकाने या वाळूतस्करीची तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

परंतु फक्त दोन चालकांवर कार्यवाही करून राजकीय वरदहस्त असलेल्या मालकांना म्हणजेच काँग्रेस चे युवा नेते सचिन कत्याल हे काल 5-6तास रामनगर पोलीस ठाण्यात हजर राहून सुद्धा त्याचेवर मुख्य आरोपी असूनही  कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती त्यामुळे राजकीय दबावापोटी कत्याल ला सोडून देण्यात येईल काय???  अशी चर्चा दिवसभर राजकीय व व्यावसायिक वर्तुळात होती. 

वाळूतस्करीतील प्रतिस्पर्धावाळू तस्करीत बक्कळ पैसा असल्याने त्यातही मोठी प्रतिस्पर्धा सुरू झाली आहे. या घटनेला अशाच प्रतिस्पर्धेची किनार आहे. 

कोरोनाचा काळ वाळूतस्करांसाठी सुवर्ण काळ ठरला. यादरम्यान, कोट्यवधीच्या वाळूची तस्करी करण्यात आली. ती वाळू तस्करी अजूनही सुरू आहे. यातील अनेकांना राजकिय वरदहस्त प्राप्त असल्याने प्रशासनही फारसे कारवाईला पुढे धजावत नाही. 

अश्या आशयाच्या अनेक बातम्या चंद्रपुरातील डिजिटल माध्यमातून फिरत असताना प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत आजच्या कार्यवाहीत फक्त चालकांवर कार्यवाही न करता जेसीबी व हायवा मालक हे खरे वाळू तस्कर असून त्यांना या कार्यवाहीतून का सामावून घेण्यात आले नाही असे जाब निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देऊन तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. 


यापुढे आज दिनांक 21 जून ला प्राप्त अधिकृत माहिती नुसार मालक दोन्ही मुख्य आरोपीवर सुद्धा गुन्हा नोंदविण्यात आला असून रामनगर पोलिसांचे पथक मुख्य वाळू तस्कर सचिन कत्याल यांच्या शास्त्री नगर येथील निवास्थानी व इतर ठिकाणी वारंवार फेरा घालत आहे. तक्रार दखल झाल्याचे कळताच सचिन कत्याल व सोबती फरार झाला असल्याचे कळते.  

या वाळू तस्करांवर फक्त अवैध तस्करीचा गुन्हा न नोंदविता ज्या घाटातून वाळू उत्खनन करताना प्रत्यक्ष जेसीबी हायवा पकडण्यात आले तेथील वाळू उत्खननाचा संपूर्ण भोगौलिक आढावा घेत शासकीय मापदंडानुसार वाळू घाट बंद असताना किती ब्रास वाळू उत्खनन झाले त्यानुसार संपूर्ण वाळू उत्खननाचा महसूल सुद्धा या आरोपींकडून वसूल करून शासकीय तिजोरीत जमा करावा या करिता आपण पाठपुरावा करू असे प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांनी सांगितले.