अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर तात्काळ कार्यवाही करा – सुरज ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष #prahar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर तात्काळ कार्यवाही करा – सुरज ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष #prahar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर – 

अवैध रेती उत्खनन करून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने घरघुती कामासाठी त्या ठिकाणी रेती आणायला गेले असता एका महिलेचा रेतीचा ढिगारा पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिले चे नाव येल्लम्मा शंकर कोडापे  असून संपूर्ण कोडापे कुटुंब मजुरी करते व त्यांना 2 मूल 1 मुलगी ( 10 वर्षा खाली )  राष्ट्रवादी नगर वॉर्ड नं 1 चे रहिवासी आहेत. 

त्यामुळे रेती उत्खनन करणाऱ्या तस्करावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे श्री सुरज भाऊ ठाकरे, राहुल चव्हाण, नितीन उदार यांनी केली आहे.

चंद्रपूर येथील राष्ट्रवादी, वृंदावन नगर वार्ड क्रमांक 1 येथील जनतेनी प्रहार जनशक्ती संघटना यांना दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18/6/2020 रोजी प्रहार जनशक्ती संघटनेचे सुरज भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात राहुल चव्हाण, नितीन उदार तथा कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले असता आढळून आले कि रेती उत्खनन करताना मोठमोठे खड्डे पडले आहेत. 

अवैध रेतीची तस्करी होत असल्यामुळे शासनाचे मोठ्य प्रमाणात महसूलाचे नुकसान होत आहे तसेच पर्यावरणाची हानी होत असल्याचे लक्ष्यात आले. या ठिकाणी रेतीचे उत्खनन करून जवळपास 3000 हजार घनमीटर रेती तस्करी झाल्याचे समजले. 

या प्रकारामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून पर्यावरणाची हानी होत आहे. सदर ठिकाणी चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या संरक्षण भिंतीचे नूतनीकरणाचे काम सुरु असून या कामासाठी लागणारी रेती कंत्राटदार श्री सुभाष कासनगोटुवार ( नगरसेवक ) यांनी याच चोरीच्या उत्खननातून वापरली गेल्याची माहिती स्थानिक जनतेनी दिली आहे. 

या सरक्षण भिंतीच्या कामात वापर केलेल्या रेतीमध्ये मातीचे जास्त प्रमाण असून या कामाचा दर्जा देखील खालावल्या गेल्याची माहिती आहे. अशा तस्करी करून काम करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी सुरज भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती संघटनेने केली आहे. 

अवैध रेती उत्खनन केल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून स्थानिक महिला घरघुती कामासाठी रेती आणण्यासाठी गेली असता त्या खड्यात ढिगाऱ्याची माती पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व प्रकाराची प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे श्री सुरज भाऊ, राहुल चव्हाण, नितीन उदार यांनी जिल्हाधिकारी  चंद्रपूर यांचेकडे निवेदनांतून केली आहे.

< div style="text-align: justify;">