ब्रम्हपुरी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर छापेमारी : चार ठिकाणी पकडकले दारू विक्रेते रंगेहाथ :पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या धडक कार्यवाह्यांमुळे अवैध धंदेवाहिकांचे धाबे दणाणले #police - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर छापेमारी : चार ठिकाणी पकडकले दारू विक्रेते रंगेहाथ :पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या धडक कार्यवाह्यांमुळे अवैध धंदेवाहिकांचे धाबे दणाणले #police

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हदीत वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या दारु विक्री व वाहतुक सुरु आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी यांनी पोलीस स्टेशनचे आधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन गोपनिय माहीती काढून पोलीस स्टेशन ह्ीत अवैध दारु विक्री व वाहतुकीवर छापा टाकणे कामी विशेष मोहीम राबवीली असता काल  दि. 07/06/2020 रोजी वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे टाकुन खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आल्या.

१) पेठवार्ड, ब्रम्हपुरी येथे कन्हैय्यासिंग भुरानी हा आपले राहते घरी विदेशी दारु विक्री करीत आहे, अशी गोपनिय माहीती मिळाल्याने त्याचे राहते घरी छापा टाकुन कार्यवाही केली असता कार्यवाही दरम्यान ऑफिसर चॉईस कंपनीच्या २० नग कि. ६,०००/- रु. व टुवर्ग स्ट्रांग बिअर १२ नग किं. ३,६००/- रु. असा एकुण ९,६००/- रु.चा माल अवधरित्या मिळुन आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही ही पोउपनि/खेडीकर साहेव सोबत नापोको/ कुणाल हेमके, मनापोकॉ/शुभांगी शेमले पोकॉ/खंडुजी मुंडकर यांनी केली.

२) मोजा मेंडकी येथील मनोज गजभिये हा पुराई बोरीचे पारीवर अवैधरित्या मोहा दारु विक्री करीत आहे, अशी गोपनिय माहीती मिळाल्यावरुन छापा टाकला असता एका कॅनमध्ये १५ लिटर मोहा दारु कि. ४,५००/- रु. चा माल अवैधरित्या मिळुन आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही ही सपोनि/ सतीश बनसोड सोबत नापोकाँ/पवन डाखरे, नापोकॉ/खुशाल उराडे, पोका/ अनुप कवठेकर यांनी केली.

३) मौजा कळंबगाव येथील हत्यारसिंग दुधानी व अंबरसिंग दुधानी हे दोघे कळंबगाव ते चिचखेडा कॅनलच्या पारीवर देशी दारु विक्री करोत आहे, अशा गोपनिय माहीतीवरुन त्या ठिकाणी छापा टाकला असता ८ नग देशी दारु किं. ८००/ रु.चा माल अवधरित्या मिळुन आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही ही सपोनि/सतीश बनसोड सोबत नापाक/ पवन ड्रामे, नापाक/खुशाल उराडे, पोकों/ अनुप कवठेकर यांनी केली.

४) मोजा पिंपळगाव (खरकाडा) येथील नदीघाटावरुन दोन ईसम मोपेड व मोटार सायकलने देशी दारुची वाहतुक करणार आहे, अशा गोपनिय माहीतीवरुन पिंपळगाव- निलज रोडवर सापळा रचला असता दोन्ही ईसम गाड्या घेवुन जवळ येताच त्यांच्यावर छापा टाकला असता दोन्ही ईसमांना पोलीसांचा सुगावा लागल्याने गाड्या व दारुने भरलेले पोते जागेवर सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. घटनास्थळी दोन पोते देशी दारु १००० नग किं. १,००,०००/-रु. व दोन दुचाकी वाहने कि. ६०,०००/- रु, असा एकुण १,६०,०००/- रु. चा माल अवैधरित्या मिळुन आला. दोन्ही दुचाकीचालकावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा करण्यात आला आहे. सदची कार्यवाही ही पोउपनि/ अख्तर सय्यद सोबत पोकों/संदेश देवगडे, चालक नापोकों/ उमेश बोरकर यांनी केली.

कार्यवाही एकुण १,७४,९००/- रु. अवैधरित्या मिळुन आलेला माल जप्त करण्यात आला.वरील चारही सदरची कार्यवाही  पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असुन यापुढेही अवैध दारु विक्री धंदे करणान्यावर बेधडक कार्यवाही करण्यात येईल व कोणत्याही अवैध धंद्यांना थारा देण्यात येणार नाही असे सांगितले.