विदर्भ ब्रेकिंग : अनैसर्गिक अत्याचार करत आठ वर्षीय बालकाचा गळा दाबून हत्या #POCSO - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ ब्रेकिंग : अनैसर्गिक अत्याचार करत आठ वर्षीय बालकाचा गळा दाबून हत्या #POCSO

Share This
खबरकट्टा / वर्धा : 

आठ वर्षीय बालकाचा  हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्या गेल्याचा घृणास्पद व संतपाजनक प्रकार घडल्याने वर्धा जिल्हा हादरून गेला आहे.

शुक्रवारी रात्री १२  वाजता शहर पोलिसांनी या प्रकरणी पोस्को कायद्यानुसार तसेच खूनाचे  गुन्हे दाखल केले. सायंकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. मृत्यू झालेल्या बालकाच्या घरा शेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने युवकाने हा क्रूर गुन्हा केला असल्याचे उघड झाले आहे.  

अत्याचार झाल्याने बालक ओरडत असतांना त्याला चूप करण्यासाठी आरोपीने त्याचा गळा दाबून  हत्या केला. नंतर बालकाचा अर्धनग्न स्थितीतील मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिला. ही बाब लक्षात आल्यावर परिसरातील लोकांनी आरोपीस बेदम मारहाण केली. 

शेवटी त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या नंतर चारशे पेक्षा अधिक संतप्त नागरिकांनी ठाण्यात ठिय्या देत आंदोलन सुरू केल्यावर रॅपिड अकॅशन फोर्स तैनात करण्यात आली होती. रात्री शवविच्छेदन झाल्यावर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.