ब्रम्हपुरी येथील भगत सिंग चौक पेठ वार्ड तील एका पाच वर्षीय चिमुकली वर त्याच वार्डातील ३० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर माहिती पीडीत चिमुकली व तीची आई घरी असताना पीडीतीचे मोठे वडील यांना भेटण्यासाठी आले आहे असे पीडित च्या आई ला सांगितले.पीडीत चिमुकली बाहेर अंगणात खेळत असताना आरोपी सचिन सुधाकर उर्फ जयवंत बगमारे हा चॉकलेट घेऊन देतोय म्हनुन कडेवर घेऊन गेला. पीडित ची आई जेवण करत असताना दरवाज्यात येऊन मुलीला कुठे नेत आहे.
मुलीला नेऊ नकोस अशी म्हंटले तरीही न ऐकता मी पाच मिनिटांत चॉकलेट घेऊन देतोय व पीडित मुलीला बळजबरीने घेऊन गेला. पाच मिनिटं वेळ होऊन न आल्याने तेव्हा पीडित मुलीची आई जेवणाचा हात घेऊन बघायला गेलीं पण तीला आरोपी सचिन दिसला नाही.म्हणुण शोधायला रस्त्यावर निघाली.तीला तेथे तीन मुले दिसले त्यांना आरोपी सचिन हा दिसलाय का म्हणून विचारले तर त्यांनी घराकडे गेला असल्याचे सांगितले.तेव्हा पीडित मुलीची आई व तीनं मुले आरोपी सचिन यांच्या घराकडे निघाले.
तर आरोपी च्या घरांचा दरवाजा बंद असल्याने पीडित मुलीची आई दरवाजा ठोठावला व माझी मुलगी कुठे आहे व आरडाओरडा केला तर घरा शेजारचे लोक जमा झाले.तेव्हा आरोपी सचिन ने दरवाजा उघडला व पीडित मुलीला घेऊन बाहेर आला.तेव्हा पीडित मुलीला आरोपी ने काय केले तर विचारले असता तर तीच्या सांगण्यावरून तीच्या वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटना स्थळावर आरोपी सचिन हा पळ काढण्याचा प्रयत्न केला तर जमा झालेल्या नागरिकांनी चांगलाच चोप दिला.यानंतर पीडीत मुली चे वडील शेतातुन घरी आल्यावर पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सचिन सुधाकर उर्फ जयवंत बगमारे यांच्या वर अल्पवयीन मुलीला बळजबरीने पळवून तीच्या वर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पीडीत चिमुकली मुलीच्या तोंडी रिपोर्ट वरून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे ३७६,(A),(१),३७६(AB)३६३,भादवी सहकलम ४,८,१० बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२अन्वे गुन्ह्याची नोंद करून आरोपी सचिन बगमारे यास अटक करण्यात आली.
पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक तथा पॉस्को पथक विभाग ब्रम्हपुरी व पो.हवालदार सतीश गुरुनले हे करीत आहेत.