ब्रम्हपुरी तालुक्यातील रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरू करा :- प्रा.अतुल देशकर #paddycrop - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी तालुक्यातील रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरू करा :- प्रा.अतुल देशकर #paddycrop

Share This
📍मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्राद्वारे मागणी.

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :-

संपूर्ण महाराष्ट्रात रब्बी हंगामातील धानाची खरेदी करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. परंतु ब्रम्हपुरी तालुक्यातील धान खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. या संदर्भात ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी ब्रम्हपुरी तालुक्यात रब्बी हंगामातील धानाची खरेदी त्वरीत सुरू करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस, माजी मंत्री मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या संदर्भात प्रा.अतुल देशकर यांनी स्थानिक स्थरावर विचारणी केली असता, आमचे गोडाऊन रिकामे नसल्याने खरेदी सुरू करण्यात आली नाही अशी माहिती मिळाली. आता रब्बी हंगाम समाप्त होऊन शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम ची तयारी सुरू केली आहे. पण अजून ही रब्बी हंगामातील धान शेतकऱ्यांच्या घरीच आहे. त्याची विक्री न झाल्याने या परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत.

या बाबत शासनाने मार्ग काढून त्वरित रब्बी हंगामातील धानाची खरेदी सुरू करण्याची मागणी प्रा.अतुल देशकर यांनी केली आहे. या मागणीला यश आल्यास नक्कीच शेतकऱ्यांची विवंचना दूर होऊन त्यांना दिलासा मिळू शकतो.