एक हात मदतीचा, रासेयो स्वयंसेवक विशाल शेंडे चा अभिनव उपक्रम : डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, राजुरा यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन कौतुक ! #NSS - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एक हात मदतीचा, रासेयो स्वयंसेवक विशाल शेंडे चा अभिनव उपक्रम : डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, राजुरा यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन कौतुक ! #NSS

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

सम्पूर्ण जगभरात कोरोना महामारी पसरलेली असून या महामारीमध्ये आपले राष्ट्र, आपले राज्य, डॉक्टर, नर्सेस यासोबत अनेक जण अत्यावश्यक सेवेत कार्य करत आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने अडचणीत असलेल्या राष्ट्राला मदत करत आहेत. 

यातूनच प्रेरणा घेऊन श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा,जिल्हा चंद्रपूर (महाराष्ट्र) येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा (N.S.S) स्वयंसेवक विशाल शेंडे यांनी (COVID-19 ) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत स्वतः मजुरीतुन मिळालेले एक हजार रुपये व  काही मित्रांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मिळालेले 800 रुपये एकूण 1800 रुपये मा. तहसीलदार राजुरा तहसील यांच्या कडे सुपूर्द केली. 

या कार्याबद्दल डॉ. रविंद्र होळी तहसीलदार राजुरा तथा अध्यक्ष , तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजुरा यांच्या कार्यालयामार्फत विशाल शेंडे याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशाल ने मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान केअर फंड मध्ये निधी देण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या मित्रमंडळी ला आवाहन केले होते. त्याच्या या आवाहनाला साद देत अनेकांनी मदत निधी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधी मध्ये गोळा केली.  

मुख्यमंत्री सहायता निधी करीता विशाल शेंडे, लेखराज देठे सर, प्रमोद उरकुडे सर, प्रवीण तूरानकर सर राजुरा, प्रकाश टोंगे सर, बालाजी ताजने, सूरज ठाकरे, प्रवीण चौधरी, डॉ. सारिका साबळे यांनी मदतीच्या हाताला साथ दिली.

विशाल च्या कार्याचे श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वारकड सर यांनी कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्राच्या या संकट काळात समोर येऊन मदत करायला हवे असे आवाहन केले.

सोबतच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की यांनी कोरोना ला हरविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांने शासनाचे नियम पाळून कोरोना योध्दा म्हणून कार्य करायला हवे,तसेच जनसामान्यांपर्यंत पोहचून जनजागृती करावी असे आवाहन केले.

विशाल शेंडे हा नेहमी प्रत्येक राष्ट्रीय कार्यात समोर असतो, राष्ट्रीय सेवा योजना पथकाशी जुडल्यानंतर त्याने महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेत असतो, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा विशाल ने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय एकता शिबिर गुवाहाटी (आसाम) येथे सहभाग घेतलेला आहे.

वरूर रोड या त्याच्या स्वगावात सुद्धा अनेक कार्यक्रम घेतलेले आहे, गावात युवा मित्रांच्या सहकार्याने सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती, लॉकडाउन च्या काळात गरजूंना मोफत मास्क वितरण, सोशल मीडियावर जनजागृती, गावामध्ये फवारणी, वृक्षारोपण, मतदार जनजागृती, स्वच्छता अभियान, तंबाखू व्यसनमुक्ती साठी लहान मुलांमध्ये जागृती,  महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन गावात प्रबोधनाचे कार्य करतो आहे.