जागेच्या वादातून जावयाने केला सासऱ्याचा खून : बल्लारपूर तालुक्यातील घटना :उपचारदरम्यान सासऱ्याच्या मृत्यू #murder_for_land_acquisition - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जागेच्या वादातून जावयाने केला सासऱ्याचा खून : बल्लारपूर तालुक्यातील घटना :उपचारदरम्यान सासऱ्याच्या मृत्यू #murder_for_land_acquisition

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

बल्लारपुर तालुक्यातील मौजा आसेगाव निवासी सुकरु वाघु शिडाम (वय - 70 वर्ष) यांचेसोबत त्यांचे जावई  विलास विठोबा मड़ावी (वय - 50 वर्ष,) आसेगाव निवासी असून या दोघांचेही घराच्या बाजूला असलेल्या मालकी हक्काच्या जागेवरुन मागील १ वर्षापासून वाद सुरु असल्याने या वादाचे रूपांतर भांडणात झाले.

दिनांक 7 जून 2020 ला रात्री 9 वाजताच्या   सुमारास आरोपी विलास विठोबा मड़ावी यांनी घटनेच्या वेळी दगडांनी चुलत सासरे सुकरु वाघु शिडाम यास मारहाण केली व या मारहाणीत सुकरु शिडाम यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर काल 8 जून 2020 ला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे उपचारार्थ दाखल केले असता उपचारा दरम्यान सुकरु शिडाम यांचे निधन झाले.

यामुळे पोलिस स्टेशन बल्लारपुर अपराध क्रमांक 410/2020 कलम 302 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुह्यातील आरोपी विलास विठोबा मड़ावी यास आसेगाव ता. बल्लारपुर यास अटक करण्यात आली. 

सदर गुन्हा संबंधीचा तपास मा.पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, मा.अप्पर पोलिस अधीक्षक साहेब, मा उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवलाल भगत, सपोनि गोंदके साहेब, सपोनि जोशी साहेब, सपोनि गायकवाड़ साहेब यांच्या सह पोलिस स्टाफ ने घटनास्थळाला भेट देवून पुढील तपास सुरु आहे.