चंद्रपूर ब्रेकिंग : युवकावर कुर्‍हाडीने हल्ला : आरोपी फरार #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : युवकावर कुर्‍हाडीने हल्ला : आरोपी फरार #murder

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथे एका युवकावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजता च्या सुमारास घडली.

प्राप्त माहिती नुसार , तू माझ्या मालकाशी का भांडतोस म्हणून मिलन वडस्कर व चंदू खडसे यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात चंदूने मिलन वर कुर्‍हाडीने सपासप तीन वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. 

घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिस तातडीने घटनास्थळावर रवाना झाले. परंतु आरोपी चंदू खडसे हा घटनास्थळावरून पसार झाला. आरोपीविरुद्ध कलम 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अरुण गुरणुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम व पोलीस कर्मचारी गजानन चरोळे करीत आहे.