चंद्रपूर ब्रेकिंग : ट्रॅक्टर ने ठोस मारून खून : बुधवार सांयकाळची घटना : युवकाने काढला वयोवृद्धाचा वचपा : आधी धमकी नंतर खून #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : ट्रॅक्टर ने ठोस मारून खून : बुधवार सांयकाळची घटना : युवकाने काढला वयोवृद्धाचा वचपा : आधी धमकी नंतर खून #murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने ट्रॅक्टर ने टक्कर मारून खून केल्याची घटना शंकरपूर येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली आहे.

सविस्तर माहिती नुसार  दयाराम रंदये (62) मृतकाचे नाव असुन पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन माळवे (वय 19 वर्ष )व दयाराम रंदये हे दोघेही घराशेजारी राहत असून यांच्यात मंगळवार ला सायंकाळच्या दरम्यान शुल्लक कारणावरून भांडण झाले होते.  

त्या भांडणात रोहन माळवे यांनी तुला ट्रॅक्टरने उडवून देतो अशी धमकी दिली होती. बुधवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मंडळ कृषी कार्यालय जवळ रोहन मांडवे यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने रस्त्यावरून जात असलेल्या दयाराम रंदये यांच्यावर ट्रॅक्टर ने टक्कर मारून गंभीर रित्या जखमी केले.  

त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रोहन माळवे यांना अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस स्टेशन ठाणेदार विनोद जांभळे करीत आहे.