अत्यंत दुःखद : चंद्रपुरात मॉर्निंग वॉक ठरली जीवघेणी : भरधाव हायवा ची धडक : एक जागीच ठार, एक जखमी : जुनोना रोड, बापूपेठ येथील आज सकाळ ची घटना #morning-walk - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अत्यंत दुःखद : चंद्रपुरात मॉर्निंग वॉक ठरली जीवघेणी : भरधाव हायवा ची धडक : एक जागीच ठार, एक जखमी : जुनोना रोड, बापूपेठ येथील आज सकाळ ची घटना #morning-walk

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोना लोकडाऊन नंतर अनेक दिवस घरातच राहिलेल्या लोकांची अनेक रस्त्यांच्या कडेने मॉर्निंग वॉक सुरु झाली आहे. परंतु एरव्ही सकाळच्या वेळात जड वाहनांची वाहतूक सुद्धा वाढली असून बहुतांश अवैध वाहतूक सकाळच्या प्रहरी होत असल्याचे व त्यातून भरधाव सुसाट गाडी हाकण्याचा या चालकांचा अजेंडा असतो. 

अश्याच एका प्रकारात आज एका मॉर्निंग वॉक पदाच्याऱ्याला जीवानिशी मुकावे लागले. आज 11 जूनच्या सकाळी असंख्य नागरिक जुनोना रोडवर फिरत असताना अनियंत्रित हायवा ट्रक ने दोघांना धडक दिली यामध्ये 60 वर्षीय शेंडे नामक वृद्ध हा ठार झाला व अन्य 1 जण गंभीर जखमी झाले.

बाबूपेठ भागातील बहुतांश नागरिक सकाळी फिरण्याकरिता जुनोना रोड वर जातं असतात, जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना ताजी व शुद्ध हवा सकाळच्या सुमारास मिळते त्यासाठी नागरिक आपल्या सोयीनुसार सकाळी मॉर्निंग वॉक करायला जातात.परंतु ही मॉर्निंग वॉक कधीकधी जीवावर बेतते असेच म्हणावे लागेल.