मोदीजी अस काय करता?? - नम्रता आचार्य ठेमस्कर #modi-on-china - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोदीजी अस काय करता?? - नम्रता आचार्य ठेमस्कर #modi-on-china

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नम्रता आचार्य ठेमस्कर(राजकीय विश्लेषक )

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी म्हणतात की, चीनने आपला एक इंच ही भूभाग घेतला नाही तर मग ते जे २० सैनिक धारातीर्थी पडले ते काय चिनी सैनिकां सोबत लपंडाव खेळत होते का?? चिनी सौनिकांनी घुसखोरी केली म्हणून तर आपल्या जवानांनी प्रतिउत्तर दिल ना?? 

आम्हला आमच्या सैनिकांवर अभिमान आहे पण ज्या कारणांनी ते शाहिद झाले ते कारण तुम्ही जनतेसमोर का मांडत नाही आहात?? आपले सैनिक बहादूर आहे नक्कीच एकाने दोघांना मारलं असेल मग चीन चे ४० सैनिक मारले गेले ही बाब चीन का मान्य करत नाहीयेत?? तुम्ही तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी आहात, सर्व देशाच्या राष्ट्र प्रमुखांना तुम्ही आलिंगन देऊन त्यांच्याशी स्नेह वाढवला आहे, मग डोनाल्ड तात्या याबाबत शांत का?? आंतरराष्ट्रीय पातळीवरून चीनवर दबाव का नाही आता??

लावा ना त्या त्यात्याना फोन ज्यांनी गोळ्यांसाठी तुम्हाला धमकावल आणि तुम्ही लगेच निर्यातबंदी उठवली, ज्यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही कोरोना कडे डोळेझाक केली, कधीतरी खरं सांगत जा आमच्या देशाला, या बाबतीत राष्ट्र के नाम संदेश का नाही?? या बाबतीत एक पण पत्रकार परिषद का नाही?? तुम्ही वस्तुस्थिती आम्हाला सांगा आम्ही तर देशा सोबत कायम आहोत, चीन ने जो भूभाग गलवान काबीज केला त्याबद्दल सांगून दिल तर कदाचित पुढच्या अनेक गोष्टी देशासाठी सोप्या होतील.

कायम खोट बोलण्यात काय हशील आहे??? तुमचे स्वयंसेवक चिनी मालावर बहिष्कार घाला म्हणत आहे?? काय हा विनोद?? मग आपल्या सरदारांचा पुतळा त्याच काय होईल?? 

चीन आणि भारत या मध्ये ७००० कोटी चा व्यापार आहे त्यातील केवळ १५०० कोटींची निर्यात आपण चीन ला करतो बाकी सगळं तिकडून आयात अनेक औषध देखील, जे आज कोरोना काळात कमी पडू शकतात, देशातील लोकांनी तुमच्या आत्मनिर्भरत योजनेसाठी मरायचं का?? आत्मनिर्भर बनायचं तर बहिष्कारने काय होणार?? त्यासाठी तर देशातील उदयोग वाढवावे लागतील तेव्हा आपल्या भक्तांना आवरा, आणि गलवान भूभागच नेमकं काय झालं ते देशाला स्पष्टपणे सांगा, देशातील प्रत्येक नागरीक आज आपले सैन्य आणि देशा सोबत आहे. 
 
देशातील शाहिदांचा असा अपमान करू नका मिस्टर मोदी, मोठा नेता तो असतो जो चूक मान्य करतो वास्तव जे असेल देश स्वीकारेल या तुमच्या निवडणुका नाही देशाच्या सार्वभौमत्व चा प्रश्न आहे.