मनरेगा अंतर्गत बोगस मजुरांचे नावे टाकून लाखोंच्या मजुरीची उचल? #Mnrega - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मनरेगा अंतर्गत बोगस मजुरांचे नावे टाकून लाखोंच्या मजुरीची उचल? #Mnrega

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती - भारी 
    
संपूर्ण भारत कोरोनाच्या जाळ्यात पडले मात्र कर्मचारी वर्ग ग्रामीण भागात बोगस कामे दाखवुन लाखोंची लूटमारी  भारी ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. भारी व मच्छीगुडा येथे मनरेगा अंतर्गत बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे सुरू असून त्यामध्ये बोगस मजुरांचे नावे टाकून  लाखो रुपयांची लूट रोजगार सेवक करीत आहे.
         
मच्छीगुडा येथे माती बंधाऱ्याचे गाढ उपसा चालू आहे त्यामध्ये भोळणखपी येथील मजुरांचे नावे टाकून लाखो रुपयांची लूट चालू केले तेथील लोकांची माहिती घेतली असता आम्ही त्या कामावर गेलो नाही असे स्पस्ट सांगण्यात  आले.  
          
तसेच मच्छीगुडा येथील मजुरांना विचारले असता तेथील नागरिकांनी असे सांगण्यात आले की भोडंखपी  येथील एकही मजूर मच्छीगुडा येथे कामावर आले नाहीत.  
          
त्याच प्रमाणे भारी येथील पांदण रस्त्याचे कामावर  मस्टर वर  स्वतःच्या  घरातील व इतर नातलगांच्या सर्व नावे मस्टर वर  दाखवून अशाच अफरातफर रोजगार सेवक करीत आहे .त्यांची लेखी तक्रार 16/6/2020 रोजी पंचायत समिती जिवती येथे देण्यात आले असून सुद्धा अद्याप कुठल्याच प्रकारची चौकशी झाली नाही. 

गावकऱ्यांच्या मन्या प्रमाणे यात सर्वत्र ब भ्रष्टाचारी  चालू झाली असून सदर प्रकरण हे दाबल्या जात आहे तरी वरिष्टानी सखोल चौकशी करून मनरेगा च्या कामावर गेलेल्या सर्व मजुरांना न्याय मिळवून देण्यात यावे व सदर प्रकरणी दोषींना कामावरून रिक्त करून त्यांची शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत भारी वासीयांकडून  होत आहे व त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.