कोंसबी खडसमारा येथे महात्मा गांधी रोजगार हमी चे काम सुरू #Manrega - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोंसबी खडसमारा येथे महात्मा गांधी रोजगार हमी चे काम सुरू #Manrega

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

सध्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा आखडा फुगतच चालला असून याची झड सर्व सामान्य माणसाला बसत आहे.तर एकीकडे शासनाने पंचायत समिती स्तरावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ग्रामपंचायतने काम सुरू करावे असे आदेश काढले गेल्या दोन महीन्या पासून लाॅकडाऊन मुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुर वर्ग हताश झाला होता.

कोसंबी खडसमारा येथील मजुरांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम मिळावे म्हणून येथील ग्रामपंचायत चे सरपंच छञपती सुरपाम व रोजगार सेवक यांनी पंचायत समिती येथील एम.आर.ई.जी.एस विभागात कामची मागणी केली.

आणि कोसंबी खडसमारा ग्रामपंचायत मार्फतीने येथील तलावाचे पाट तसेच पांदन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले यावेळी येथील ग्रामपंचायतचे सदस्य झिंगर जुमनाके,सुरेखा वलके,सफाई कामगार सोमेश्वर मोहुर्ले,संगणक परीचालक प्रशांत मस्के,स्वच्छतागृही शशिकांत सुरपाम उपस्थित होते.

सदर या कामावरती मजुरांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जात असून त्यांना सामाजीक अंतर,मास,यांचे महत्त्व समजावून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम सुरू करण्यात आले कोसंबी खडसमारा येथे रोजगार हमी योजनेचे काम सुरू केल्याने मजुर वर्गाच्या चह-यावरती आनंदाचे हास्य पहावयाला मिळत आहे.