ब्रम्हपुरीतील हातावर पोट असलेले नाभिक चिंतेत* :- लॉकडॉऊन मुळे व्यवसाय अडचणीत..... :- दोन वेळच्या जेवणाची पडत आहे भ्रांत #Lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरीतील हातावर पोट असलेले नाभिक चिंतेत* :- लॉकडॉऊन मुळे व्यवसाय अडचणीत..... :- दोन वेळच्या जेवणाची पडत आहे भ्रांत #Lockdown

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :ब्रम्हपुरी :- 

कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडॉऊनची घोषणा केली. पण या लॉकडॉऊन च्या काळात अनेक उद्योग बंद पडले. या पैकी एक उद्योग म्हणजे सलुन व्यवसाय ब्रम्हपुरी शहरात व ग्रामीण भागात सलुन व्यावसायिकांची अधिकच आहे. आणि अनेक दिवसांपासून हा व्यवसाय ठप्प पडला आहे. 

त्यामुळे दैनंदिन जीवनाची गुजराण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोरोना महामारीपेक्षा भुकेने बळी जाणार आहेत. विषेश म्हणजे या व्यवसायात अनेक तरुण कार्यरत आहेत. नाभिक संघटना प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पणे पालन करत असल्याचे सांगितले आहे. पण अशा काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रश्न अनेक व्यवसायिकांना पडत आहे. 

ब्रम्हपुरी शहरात व ग्रामीण भागात सलुन व्यावसायिकांची 225 इतकी संख्या आहे. महीण्यातील रविवार हा नाभिक सलुन व्यावसायिकांसाठी महत्वाचा भाग आहे. दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या ठरणाजया या सर्वच नागरिकांन कडे दुर्लक्ष केले जाते. सध्या सलुन दुकाने बंद असल्याने नागरिकांना केस कापणे, दाढी करणे कठीण झाले आहे. 

तेच नव्हे तर अनेक जण केस काळे करण्यासाठी व चेहरा सुंदर दिसला पाहिजे या साठी सुद्धा सलुन मध्ये जातात. पण सध्या हे दुकान बंद असल्याने लहान मुलांना पासून तर मोठ्या व्यक्ती पर्यंत केस कापण्याची मोठी पंचाईत झाली आहे. काही नागरिकांनी चक्क केस व दाढी करण्याचे धडे सुध्दा घरच्या घरी घेतले. मात्र दैनंदिन जीवनात गरजेचा असणाऱ्या नाभिक संघटनेचा मोठा अडचणीचा काळ सुरू आहे. 

हे नागरिक घरात बसून आहेत. अनेकांचा पोट या व्यवसायात असल्याने मुलांचे शिक्षण कसे करायचे असा प्रश्न पडतो आहे. लॉकडॉऊन उठल्यानंतर हि नागरिक सलुन मध्ये येतील की नाही शंका निर्माण होत आहे. कोरोना संकटात कोणकोणती काळजी घ्यावी लागते सर्व गोष्टींचा विचार करून टावेल, सॅनिटायझर, व सोशल डिस्टन ठेवून व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात यावी अशी खंत नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडुन करण्यात आली. 

सध्या परिस्थिती खुप नाजूक आहे. दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत पडली आहे. पालकमंत्री यांनी चार दिवस पुरेल इतका अनाज किट वाटप केले. पण अजून पर्यंत प्रशासनाने व कोणत्याही संघटने मदतीचा हात पुढे केला नाही. पुर्वी चे दिवस बघायला मिळेल कि नाही या कडे आस लावून व्यवसायिक या भुकमरी ने तर मरणार नाही ना याची काळजी सतावू लागली आहे.

पालकमंत्री यांनी शहरातीलच नाभिक व्यवसायिकांना किट वाटप केले. पण ग्रामीण भागातील नाभिक व्यवसायिक या पासुन वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात रोष व्यक्त केला जात आहे. आणि एक महिण्या अगोदर सलुन सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण आता पुर्णपणे व्यवसाय ठप्प पडला आहे. 

सोसल डिस्टन ठेवून व नवीन टावेल व कागदी पेपर वापरले जात आहे. तरी त्वरित आमच्या कडे लक्ष वेधून आम्हाला व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात यावी नाही तर दोन तीन दिवसांत आम्ही आमच्या संघटनेकडून एक आंदोलन छेडण्यात येईल.-मयुर मेत्राम, नाभिक संघटना ब्रम्हपुरी (प्रसिद्ध प्रमुख)