सावली वनपरिक्षेत्रात रानडुक्कराची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात बिबट अडकून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे
परिसरात पुन्हा रानडुक्कर ची शिकार करणारी टीम सक्रिय झाली असल्याचे यावरून स्पष्ट होते. रानडुकरासाठी लावलेल्या या जाळ्यात बिबट अडकून पडला मात्र स्वतःला काढण्याचा ओघात पुन्हा अधिक अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
घटना सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्यहाडखुर्द उपवनक्षेत्रातील शिर्शी बिट क.न.1534 मौजा साखरी माल येथे सदर जाळ्यात बिबट अडकल्याची माहिती वनविभाग सावली यांना देण्यात आली त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटना स्थळी रवाना झाले.
घटनास्थळी पाहणी केली असता त्यात बिबट चा मृत्यू झाल्याचे दिसले.सदर बिबट ला जाळी बाहेर काढण्यासाठी चंद्रपुर वरून चमू बोलविण्यात आली मात्र ते पोहचण्याचा अगोदरच बिबट चा मृत्यु झाला.
याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी रानडुक्कर च्या शिकार प्रकरणी 6 आरोपीना अटक करण्यात आलेली होती. ही घटना ताजी असतानाच मात्र जंगलात हे जाळे कुणी लावले त्याचा तपास वनाधिकारी करीत आहे.