जुलै २०१९ पासून मानधनाचा प्रस्ताव न पाठविल्यामुळे मानधनापासून वंचित असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय वसतिगृह कारवा जि. चंद्रपूर येथील वसतिगृह अधिक्षक अशोक जाधव यांनी कुटुंबासह आजपासून पुकारलेल्या आमरण उपोषणाची सायंकाळी यशस्वी सांगता झाली. श्री. जनजागृती शिक्षण मंडळ स्नेहनगर या संस्थेचे सचिव तुकाराम पवार व संचालक मंडळ यांनी जाणीवपूर्वक त्यांना मानधनापासून त्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप अशोक जाधव यांनी केला होता.
आज सकाळपासून शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित मंत्री महोदय आणि अधिकारी यांना फोन करण्यास सुरुवात केली होती. समाजकल्याण अधिकारी व उपमुख्य अधिकारी यांनी देखील भ्रमनभाषवर संपर्क करण्यात आले होते. विमाशी व विदर्भ शिक्षक संघाने सामाजिक न्याय मंत्रालयाशी संपर्क साधून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.उपोषणाची सांगता खालील मागण्याच्या आश्वासनाने झाली.
यापूर्वी झालेली सुनावणी पुर्णतः चुकीची असून लॉकडाउन नंतर पुन्हा सुनावणी घेण्याचे मुख्याधिकारी महोदयांनी मान्य केले.सांस्थाचालकाना वेतन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थ्यांच्या पुराव्यावरून अधीक्षक जाधव वसतिगृहात कायम हजर असल्याचे मान्य करण्यात आले.
संस्थाचालकांनी हजर राहत नसल्याचा आरोप खोटा असल्याचे मान्य करण्यात आले. वसतिगृह अधीक्षक जाधव यांना कळू न देता कुलूप तोडून रेकॉर्ड मुख्याध्यापकाकडे देण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.