वृंदावन जिनिंग मालक अग्रवाल यांचेकडून वार्ताहराला धक्काबुक्की व जिवेमारण्याची धमकी* गोंडपीपरी पोलिसात गुन्हा दाखल #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वृंदावन जिनिंग मालक अग्रवाल यांचेकडून वार्ताहराला धक्काबुक्की व जिवेमारण्याची धमकी* गोंडपीपरी पोलिसात गुन्हा दाखल #gondpipari

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

गोंडपीपरी येथील एका वृत्त वाहिनीचे पत्रकार (वार्ताहर )राजकपूर भडके यांना विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगचे मालक सौरभ पंकज अग्रवाल,व शुभम पंकज अग्रवाल यांनी काल सांयं. 6:30च्या सुमारास धक्काबुक्की करून दुचाकींचा चावी हिसकावली व अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी गोंडपीपरी पोलिसात दोन्ही भावाविरुद्ध विविध कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोंडपीपरीचे पत्रकार राजकपूर भडके हे काल दि.11रोजी सांय.6:30च्या सुमारास आपल्या दुचाकी वाहनाने तारसा येथे घरी जात असताना रस्त्यालगत असलेल्या वृंदावन जिनिंग जवळ शेतकऱयांचा घोळका व गोंगाट दिसला, ते पाहण्याकरिता मी रोडच्या कलेला थांबलो,तेवढ्यात काही शेतकरयांनी जवळ येऊन आपल्या समस्येचं कथन करीत असताना जिनिंगचे मालक सौरभ आणि शुभम या दोन्ही भावांनी धावत येऊन दुचाकींचा चावी हिसकावली व धक्काबुक्की करत  गेट के अंदर चल  म्हणत आपल्या कार्यक्षेत्रात ओढत नेण्याचा प्रयत्न केला.सोबतच अश्लील शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तुम्हणे हमारी न्यूज छापा म्हणत ओढाताण करीत होते.
   
   
दि.8रोजी शेतकऱयांच्या प्रश्नाला घेत गोंडपीपरीतील कापूस खरेदी केंद्र बंद, शेतकरी पुन्हा अडचणीत या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली.आणि त्याच बातमीचा राग मनात ठेवून हा प्रकार झाला असल्याचे भडके यांचे म्हणणे आहे.

सदर प्रकरणी गोंडपीपरी पत्रकार संघांनी तात्काळ कारवाईची मागणी केली असून ठाणेदार धोबे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून भारतीय दंड संहिता कलम294,323,504,506,34 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.यावेळी विठ्ठलवाडा परिसरातील शेतकरी,व गोंडपीपरी तालुका पत्रकार संघाचे शिष्ठमंडल उपस्थित होते.